Ad will apear here
Next
स्वरसम्राज्ञी लता
गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी आदी विशेषणांनी गौरविलेल्या व भारतरत्न सन्मानप्राप्त लता मंगेशकर म्हणजे भारतीय चित्रपटांच्या सुवर्णकाळातील सोनेरी पान आहेत. १९५० ते १९७० या काळातील सर्व संगीतकारांची पहिली पसंती लता मंगेशकर असे. अलौकिक प्रतिभेच्या या गायिकेच्या शास्त्रीय, निमशास्त्रीय, सोलो आणि द्वंद्वगीतांचा नजराणा रत्नाकर फडके यांनी ‘स्वरसम्राज्ञी लता’मधून पेश केला आहे.

गुलाम हैदर, मदन मोहन, वसंत देसाई, रोशन, सी. रामचंद्र सचिनदेव बर्मन, नौशाद, खेमचंद प्रकाश, राहुल देव बर्मन, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, अनिल विश्वास आदी संगीतकारांची लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक गाण्यांचे रसग्रहण, गाण्यांची सौंदर्यस्थळे, संगीतकारांचा परिचय व खास आठवणी यातील प्रत्येक प्रकरणांमधून दिल्या आहेत.

‘ए मलिक तेरे बंदे हम’, ‘याद रखना चाँद, तारों, इस सुहानी रात को’, ‘मोहे भूल गये सावरियाँ’, ‘आयेगा आयेगा आनेवाला’, ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए’ अशी अनेक सुरेल गीते व द्वंद्वगीतांच्या या स्वरयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक गाण्यातील आधाररागांची नोंद यात दिली आहे.          

पुस्तक : स्वरसम्राज्ञी लता
लेखक : रत्नाकर फडके
प्रकाशक : संकेत प्रकाशन
पाने : १५९
किंमत : २७५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZZOBW
Similar Posts
हम तुम ये बहार... संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हम तुम ये बहार...’ या गीताचा....
लता मंगेशकर... एकाच आवाजातल्या अनंत भावच्छटा! लताबाईंच्या आवाजाला साध्या फूटपट्ट्या का लावता येत नाहीत? एकच आवाज शिळा, एकसुरी न होता, अनेक तपं आपल्यावर अधिराज्य गाजवतो, हे कसं शक्य झालं असावं? हा आवाज कधीच सगळ्यांसाठी सारखा भासला नाही... सगळ्या भावनांसाठी तो एकाच प्रकारे लावण्यात आला नाही... प्रत्येक भावनेचा त्या त्या व्यक्तिरेखेसाठी असलेला सूक्ष्म पदर त्या आवाजातून समोर आला
बात बात में रुठो ना.... अमिया चक्रवर्ती हे जुन्या काळातील उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट निर्माते व लेखकही. लेखन क्षेत्रातील त्यांची कारकीर्द फार मोठी नाही; पण एका लोकप्रिय व उत्तम चित्रपटासाठी काय आवश्यक असते याची त्यांना जाण होती. आणि त्यामुळेच चित्रपटातील गीते या महत्त्वाच्या भागाकडे त्यांचे बारीक लक्ष असायचेच. सहा मार्च हा त्यांचा स्मृतिदिन
गुणी बाळ असा... ‘गुणी बाळ असा, जागसी का रे वाया, नीज रे नीज शिवराया....’ ही गोविंदाग्रज यांनी साक्षात छत्रपती शिवरायांसाठी लिहिलेली अंगाई ऐकली की आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात. गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांची उद्या, २४ मे रोजी जयंती आहे. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात, त्यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language